Shrirampur : जिल्हाधिकारी-यांच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल बेलापूरात व्यापा-यावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बेलापूर – कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याचे माहित असतानाही हलगर्जीपणा दाखवून किराणा दुकान सुरु ठेवल्याच्या कारणावरुन बेलापूर पोलिसांनी एका किराणा दुकानदारासह दोन जणावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. 

कोरोनामुळे गावातील दुकाने पाच वाजता बंद करण्याचा जिल्हाधिकारी यांचा आदेश असताना त्यानंतरही दुकान उघडी ठेवून कायद्याचा भंग करणा-या व्यापा-या विरुद्ध बेलापूर पोलिसांनी प्रथमच कारवाई केली आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याचे माहित असताना तोंडास कोणत्याही प्रकारचे मास्क न लावता कोणतीही खबरदारी न घेता सदर आजार पसरण्याचा संभव असल्याचे माहित असूनही हरिप्रसाद सोमनाथ मंत्री यांनी त्याच्या मालकीचे ओंकार किराणा स्टोअर्स नावाच्या दुकानात किराणा मालाचे ग्राहक करुन कोरोना आजाराचा संसर्ग होऊन स्वतःचे व इतराच्या जिवीतास धोका निर्माण होईल, असे कृत्य केले. तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशचा भंग केल्यावरुन हरिप्रसाद सोमनाथ मंत्री यांच्याविरुध्द पोलीस कॉन्स्टेबल पोपट भोईटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच जाकीर असीफ शेख राहणार गोंधवणी श्रीरामपूर याने आपल्या ताब्यातील मोटार सायकल टी व्ही एस स्टार, सीटी एम एच १७सी बी ५९११ ने मास्क न वापरता विनाकारण फिरत असताना आढळून आला पोलीस कॉन्स्टेबल हरिष पानसंबळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाचा भंग केल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलापूर पोलिसांनी गेल्या काही दिवसात विनाकारण फिरणारे मास्क न वापरणारे यांच्या विरुद्ध जोरदार मोहीम सुरु केली असून ग्रामस्थांनी पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे साईनाथ राशिनकर पोपट भोईटे निखील तमनर यांचे अभिनंदन केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेलापूर पोलिसांनी कंबर कसली असून मास्क न वापरता विनाकारण फिरणा-या एका राजकीय व्यक्तीसह तीन जणावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मास्क न लावता  मोटार सायकल बजाज सी टी १०० एम एच १७ बी पी ३२५८ वर विनाकारण फिरुनआपल्या व इतरांच्या आरोग्यास धोका होईल, असे बेकायदेशीर व हलगर्जीपणाचे कृत्य केले. तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाचा भंग केला यावरुन बेलापूर ग्रामपंचायतीचे सदस्य विवेक गंगाधर वाबळे यांच्या विरुध्द पोलीस कॉन्स्टेबल पोपट भोईटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन  गुन्हा दाखल केला आहे.
तसेच नसीर अहमद शेख हा मास्क न लावता बजाज डिस्कव्हरी मोटारसायकल एम एच १७ ऐ के ४६९ वर विनाकारण फिरुन मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाचा भंग करताना आढळून आला बेलापूर खूर्द येथील राहुल बाबुराव थोरात याचेवरही पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे विनाकारण फिरणा-या अनेकांचे धाबे दणाणले आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here