प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी ट्विट करून फोटो अपलोड केला आहे. या फोटोवरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगलीय. यात जीपमध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवार असून त्याचे स्टेअरिंग व्हील अजित पवार यांच्या हातात आहे.
खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखात घेतली होती. त्यात उद्धव ठाकरे यांनी आमची रिक्षा तीन चाकी असली तरी त्याचे स्टेअरिंग व्हील आपल्या हातात असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर हा फोटो चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. कारण यात अजित पवार यांच्या हातात स्टेअरिंग व्हिल आहे.
भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी आपल्याचा हातात स्टेअरिंग असल्याचे म्हणू द्या, पण अजितदादांनी फोटो ट्विट करून सगळं सांगितलं आहे. आम्हाला काय म्हणायचं ते अजित पवार यांनीच सांगितले आहे. अजित पवार हे मंत्रालयात बसून काम करतात. सध्या महाराष्ट्राचं स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे यापेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. परंतु हे सरकार दुसरं कोणी पाडायीच गरज नाही, ते स्वत:च पडतील, असे विनायक मेटे यांनी म्हटले.