Rajsthan Vidhansabha : काँग्रेसची माघार : पायलट ग्रुपच्या आमदाराविरोधात दाखल याचिका घेतली मागे

0

सर्वोच्च न्यायालयात अवघ्या तीन मिनिटात निर्णय

राजस्थान विधानसभेतील बागी आमदार (पायलट ग्रपच्या) आमदारा विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका काँग्रेसने मागे घेतली आहे. आज अवघ्या तीन मिनिटात सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी झाली. 

राजस्थान विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी अपिल केले. कारण उच्च न्यायालयात दाखल केलेली त्यांची याचिका निष्प्रभ ठरली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातून याचिका मागे घेतली आहे.

तर त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे की याचिका पुन्हा मागे घेतली म्हणून आम्ही या मुद्द्यावरून मागे हटलो असे नाही. उच्च न्यायालयाच्या 32 पानी आदेशाचा आम्ही अभ्यास करू. तसेच काँग्रेसमध्ये याबाबत दोन गट आहेत. पहिला गट हा मुद्दा राजकीय पद्धतीने सोडवावा या मताचा आहे तर दुसरा गट कायदेशीर लढा द्यावा या मताचा आहे. त्यामुळे ही याचिका मागे घेत आहे, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here