प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

तालुक्यातील वाघोलीत गावांतर्गत पेवर ब्लॉकच्या कामाचे भूमिपूजन ह.भ.प. भाऊसाहेब महाराज भलसिंग व ह.भ.प. सूर्यभान महाराज केशभट यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.
त्याप्रसंगी प्रमुख उपस्थित युवा नेते उमेश भलसिंग तसेच तंटा मुक्त अध्यक्ष राम भाऊ पवार, ग्रामपंचायत सदस्य सोपान पवार, बापू भलसिंग, रवींद्र शेळके, दिनकर फुंडे तसेच ग्रामस्थ रमेश भलसिंग,जाधव मामा,दादासाहेब गाडगे,रमेश दातीर,शरद ब्राह्मणे, अशोक शेळके ,भगवान शेंडगे, कपिल भलसिंग, अशोक ढणें, अजित भलसिंग, संतोष शेळके,संतोष भलसिंग, आदेश भलसिंग व कॉन्ट्रॅक्टर मनोज मुरदारे व राहुल नांगरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
गावातील सर्व रस्ते हे सुंदर व स्वछ असे पेवर ब्लॉकचे होणार असून त्याची रुंदी प्रशस्त अशी 4 मीटरची असणार आहे. या वर्षात गावातील सर्व रस्ते पूर्ण होतील, अशी माहिती गावाचे नेते उमेश भालसिंग यांनी दिली. वाघोली गाव हे नेहमीच चांगले उपक्रम राबवणे यात तालुख्यामध्ये अव्वल आहे.