शिवसेनेचं अध:पतन; उद्धव ठाकरेंचं वक्तव्य हा ढोंगीपणा, विहिंपची सडकून टीका

0

मुंबई ः राममंदिर भूमीपूजनाच्या मुद्यावरुन विश्व हिंदु परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. राम मंदिराबाबत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य हे शिवसेवेच्या अध:पतनाचं चिन्ह असल्याचं विश्व हिंदू परिषदेने म्हटलं आहे. राम मंदिराचं भूमिपूजन हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करण्यात यावं असं ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यावरून ही वादाची ठिणगी पडली आहे.
भूमीपूजन व्हिसीद्वारे करण्यात यावं हे उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य आंधळ्या विरोधातून आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेचे या वक्तव्यामुळे अध:पतन झालं आहे. मंदिराच्या उभारणीकरता भूमीपूजन हो पवित्र काम आहे, ते व्हिसीद्वारे करता येणार नाही असं विश्व हिंदू परिषदेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकार म्हटलं आहे.
कोरोनाचे सगळे नियम पाळून हा कार्यक्रम होणार आहे आणि यात फक्त 200 जण सहभागी होणार आहेत हे स्पष्ट करण्यात आलं आहे. असं असतानाही कोरोनाची चिंता व्यक्त करत केलेलं उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य म्हणजे केवळ ढोंगीपणा असल्याचंही विहिंपने म्हटलेलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला हे भूमिपूजन होणार आहे. त्यामुळे जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. हा कार्यक्रम कसा असेल? काय होणार? कोण कोण येणार? याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. कोरोनामुळे कार्यक्रमावर बंधन येणार असली तरी तो कार्यक्रम साधाच पण ऐतिहासिक व्हावा यासाठी उत्तर प्रदेश सरकार कामाला लागले आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाची सुरुवात 3 ऑगस्टपासूनच होणार आहे. काशीतले विद्वान यासाठी पौरोहित्य करणार आहेत.
कार्यक्रम पुढीलप्रमाणे ः 3 ऑगस्ट – गणेश पूजा, 4 ऑगस्ट – रामार्चन, 5 ऑगस्ट – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन. 12.15 मिनिटांनी पंतप्रधान राम मंदिराच्या बांधकामाची पहिली वीट लावणार आहेत.
9 नोव्हेंबर 2019 ला सुप्रीम कोर्टाने अयोध्येचा निकाल दिल्यानंतर राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हापासून तयारीला सुरुवात झाली आहे. 25 मार्च रोजी गर्भगृहावर असलेल्या मूर्तींना तात्पुरत्या मंदिरात स्थापित करण्यात आलं होतं.
161 फुटांचे हे मंदिर असणार आहे आणि त्याला पाच घुमट असतील. गेल्या काही दशकांपासून मंदिरासाठी लागणार्‍या खांबांचं काम कारसेवकपूरम इथं सुरु होतं. त्याचाच वापर आता केला जाणार आहे. या बांधकामात देशातल्या लोकांनाही सहभागी करून घेतलं जाणार आहे.
कोरोनाची परिस्थिती थोडी निवळली की त्यासाठी देशभर व्यापक कार्यक्रम राबविण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here