Shrirampur : धार्मिक’स्थळी’ गुटखा व मावा खाऊन पिचकाऱ्या  

उक्कलगाव येथील हनुमान मंदिरातील प्रकार 
श्रीरामपूर – जिल्हयात नियोजित प्रशासकीय इमारत, दवाखाने,  महाविद्यालये, शाळा, सहकारी सेवा संस्था, शासकीय बॅका, निमशासकीय संस्था, धार्मिक स्थळे, मंदिरे, आदी ठिकाणी अपवृत्तीच्या लोकामुळे अनास्थेचा प्रकार ‘थुंकू’ तेथेच गुटखा व मावा तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर धार्मिक स्थळी पिचकाऱ्या मारून ‘भिंती’ व ‘फडची’ रंगवली जात आहेत. या अपवृत्तीच्या लोकांमुळे घाणेरड्या प्रकार घडत असल्याने या लोकांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 
धार्मिकस्थळी बसण्यास आल्यानंतर तंबाखु गुटखा व तत्सम पदार्थ खाऊन ते लोक पिचकाऱ्या मारत आहेत. यातच पब्जी खेळण्याचा उपद्रव सध्या स्थितीला वाढला आहे. ते निवांतपणा घालविण्यासाठी धार्मिक स्थळांचा आश्रय घेताना दिसत आहेत. मंदिरापाशीच ठिकठिकाणी थूंकले आहे. येथीलच काही भागातील परिसर थूकूंन रंगून टाकला आहे. परिसर अस्वच्छ विद्रूप करून टाकला आहे. मंदिराभोवती अस्वच्छता पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियान सुरू केलेले असताना शासकीय कार्यालये व दवाखाने शाळा महाविद्यालयेत स्वच्छ भारत अभियानला अपवृत्तीच्या लोकांमुळेच हरताळ फासत आहेत. ‘धार्मिक’ता येणार्‍याच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या अपवृत्तीच्या लोकांचा शोध दोषीवर कारवाई करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
धार्मिकतेची पवित्रता राखा नाहीतर कारवाईला सामोरे जा – अखिल भारतीय मराठा संघाचे तालुकाध्यक्ष दिलीप थोरात
काहीच विघ्नसंतोषी लोकामुळे गावाची बदनामी होत आहे. त्यातच काहीही अपवृत्तीमुळे लोक धार्मिक ‘स्थळाचे’ पावित्र्य टिकवून न ठेवताच मद्यपीन शौकीनांचा, गुटखा, मावा, खाऊन आढळून आल्यास कारवाईला सामोरे जा. इशारा अखिल भारतीय मराठा संघाचे तालुकाध्यक्ष दिलीप थोरात यांनी ‘राष्ट्र’ सह्याद्रीशी बोलताना सांगितले.
पब्जी खेळणा-यांचा उपद्रव
मोबाईलच्या जमान्यात नवनवीन गेम खेळण्यासाठी उपलब्ध होताना दिसत आहेत. त्यातच पब्जी नावाची नवीन गेम उद्यास आली. त्यात पब्जीच्या तासनंतास खेळामुळे तरुण वर्गातून आत्महत्याचे प्रकार घडलेले आहेत. याठिकाणी रात्रभर ‘काही’ पब्जी खेळणारे बहाद्दर आढळून आले आहे. हा त्यांचाच घाणेरडा उपद्रव दिसतोय, काही’नी’ अंदाज वर्तवला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here