Shrigonda : तालुक्यात एका रात्रीत आठ नव्या रुग्णांची भर

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काल (दि26) रात्री दहा वाजल्यापासून ते आज (दि27)दुपारपर्यंत तालुक्यात 8 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

काष्टी-5, बनपिंप्री-1, टाकळी लोणार-1, श्रीगोंदा शहर-1, असे नवे रुग्ण सापडले आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या आता 114 इतकी झाली असून ऍक्टिव्ह रुग्ण(उपचार घेणारे) 31 इतके आहेत. तसेच आता श्रीगोंदा तालुक्यात रॅपिड टेस्टला सुरुवात करण्यात आली असून त्यात एक व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here