Karjat : डॉ. विलास काकडे याचे निधन, तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कर्जत : शहरातील प्रसिद्ध डॉक्टर विलास काकडे (बाबा) यांचे सोमवारी पहाटे दुःखद निधन झाले. कोरोनातून नुकतेच ते बरे झाले होते. मात्र, शरीरातील अवयव निकामी झाल्यामुळे अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली आणि त्यांना मृत्यूने गाठले. त्यांच्या निधनाने कर्जतच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी शोककळा पसरली. 

कर्जत शहरातील सर्वात हुशार आणि अनुभवी वैद्यकीय व्यक्तिमत्व म्हणून डॉ. विलास काकडे यांची ओळख होती. त्यांना सर्वत्र बाबा नावाने ओळखत असे. त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेने अनेकांना जीवनदान दिले होते. त्यांच्या उपचारामुळे अनेकांना हायसे वाटत होते. त्यांच्या वैद्यकीय सेवेमुळे कर्जतसह लगतच्या तालुक्यातील रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी मोठ्या संख्येने येत होती. त्यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत रुग्णसेवा करण्यात आपले जीवन पणास लावले.
कर्जत तालुक्यात मे महिन्याच कोरोनाने शिरकाव केला होता. मात्र, त्यास कर्जत शहर अपवाद होते. मात्र, शहरात कोरोनाचा शिरकाव झाला. ते नगर येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत होते. त्यातून ते पूर्ण बरे झाले होते. त्यांचा कोरोना अहवाल सुद्धा निगेटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांची प्रकृती सुधारत होती. मात्र, शरीरातील इतर अवयव हळूहळू निकामी होत गेल्याने त्यांना पुढील अधिक उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले होते. मात्र, सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची वार्ता कर्जत शहर आणि तालुकयात समजताच मोठी शोककळा पसरली होती.
डॉ. विलास काकडे यांच्या दुर्दैवी निधनाने वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते नवशिक्या डॉक्टरासाठी मोठे आधारवड होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व विवाहित मुलगी असे कुटुंबीय आहे. त्यांचा मुलगा सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात काम करीत आहे.
अनेकांचा देवदूत हरपला – सोशल मीडियावर श्रद्धांजलीचा पाऊस

कर्जत शहर आणि तालुक्यात रुग्णसेवा देताना डॉ. विलास काकडे यांनी अनेकांना जीवनदान दिले होते. त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या उपचाराचे अनुभव कथन करताना अनेकांना भरून आले होते. त्यांच्या निधनाने एक देवदूत हरपला, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करताना भावपूर्ण श्रद्धांजली देत होते. 

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here