Shevgaon : ढोरजळगावसह परिसरातील काही गावांमध्ये ओल्या दुष्काळाची भीती

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

ढोरजळगांव – शेवगांव तालुक्यातील ढोरजळगांव, भातकुडगांव, शहरटाकळी, आव्हाणे, आखतवाडे, आपेगांव, गरडवाडी या परिसरात मागील आठ दिवसापासून सुरु आसणा-या सततच्या पावसाने पिके जलमय झाली असून ओल्या दुष्काळाचा धोका निर्माण झाला आहे.

शेवगांव तालुक्यातील ढोरजळगांव परिसरात दरवर्षी पावसाचे अगमन हे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात होते. मात्र, चालूवर्षी सुरूवातीच्या मृग नक्षत्रापासूनच पावसाने जोर धरला. सुरुवातीला कमी पाऊस व मागील आठवड्यात गुरुवार ते रविवार मुसळधार पावसाने नद्या, ओढे, नाले, तुंडुंब भरून वाहत असून मूग, बाजरी, कपाशी, तूर पिकांमध्ये पाणी साठवून पिके पिवळी पडण्यास सुरुवात झाली आहे.

सततच्या पावसामुळे काळटी जमीनीत अतिपाणी साठल्यामुळे व पावसामुळे कपाशी मूग तुरी सोयाबीनसारखी पिके जागेवरच सुकू लागली असून परिसरात आगामी पुढील काही दिवसात असाच पाऊस पडत राहिल्यास पिकांची वाट लागणार असून कृषि विभागाच्या वतीने अतिवृष्टीच्या भागाची पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.

अनिल मडके:-(कृषिऊत्पन्न बाजार समिती सभापती शेवगांव)

शेवगांव तालुक्यातील शहरटाकळीसह सर्वच भागात सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी प्रमाणात होते. मात्र, गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने पिके सडून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. दरवर्षी प्रमाणे कोरडा दुष्काळ म्हणून ओळखला जातो. माञ, यावर्षी ओला दुष्काळ असून शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याचे अवाहन मडके यांनी केले आहे.
राजेश फटांगरे:- सरपंच:- प्रगतिशील शेतकरी
भातकुडगांव परिसरात दरवर्षीच्या तुलनेत अतिप्रमाणात पर्जन्यमान झाले असल्याने काही भागात काळी व मुरमाटी जमीन असल्याने सततच्या पावसाने पाण्याचा निचरा होत नसल्याने पिके पूर्णपणे कोमेजून जाऊ लागले. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनाम्याची मागणी फटांगरे यांनी केली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here