Home corona Shrigonda Breaking : कोरोनाचा तालुक्यात पहिला बळी, तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू

Shrigonda Breaking : कोरोनाचा तालुक्यात पहिला बळी, तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू

1

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांनी शंभरी पार केली असून एकूण रुग्ण संख्या १२२ एवढी वाढली असतानाच सोमवार (दि. २७) श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सुरत येथून बेलवंडी येथे आलेल्या कुटुंबापैकी ३० वर्षीय तरुणावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु असतानाच शरीराकडून कोरोनाविरुद्ध उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने मृत्यू झाला, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आठ दिवसापूर्वी सुरत येथून बेलवंडी येथे आलेल्या पती पत्नी व मुलांना तालुक्यातील बेलवंडी येथील शाळेत क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यानंतर त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. आलेल्या तपासणी अहवालात पती पत्नी व २ मुले असे सर्व जण पॉझिटिव्ह निघाले.  त्यामुळे या कुटुंबियांना उपचाराकरिता श्रीगोंदा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात दाखल करण्यात आले होते.
यामधील मुलांच्या वडिलांना पाठीमागील आजारामुळे जास्त त्रास होऊ लागल्याने त्यांना अहमदनर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने आज सकाळी मृत्यू झाल्याची खबर मिळाली. तालुक्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी घाबरुन न जाता स्वतःची तसेच कुटूंबाची काळजी घ्यावी, असे अवाहन केलें.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here