Shrirampur : वाळू तस्कारांना अभय कुणाचे?  

महसूल प्रशासनाच्या डोळ्यादेखत दिवसाढवळ्या वाळूचा उपसा  
तालुक्यातील उक्कलगाव,- गळनिंब, येथिल ‘प्रवरा’ नदी’पात्रातून’ खुलेआम वाळूचा उपसा केला जात आहे. नदी पात्रातून बैलगाडीतून, ट्रॅक्टरच्या माध्यामातून, पिकअप वाहनातून वाळूची लूट केली जात आहे. विशेष म्हणजे वाळूतस्कारांची नवीन शिल्कल उदयास आली असून, मोटारसायकलवर कॅरेटच्या साहाय्याने बांधून नेत दिवसाढवळ्या वाळूची वाहतूक केली जात आहे. 
कॅरेटमधून वाळू भरून नेत नदीबाहेर जवळील अंतरावर वाळू नेऊन टाकली जात येथून पिकअप चारचाकी वाहनातून वाळूची मोठी लूट श्रीरामपूरकडे वाहिली जात आहे.
प्रवरा नदीपात्रातून अनेक दिवसापासूनच वाळूतस्कार लपून-छपून दिवस रात्र वाळूचा उपसा खुलेआम करत आहे. महसूल प्रशासनाच्या डोळ्यादेखत दिवसाढवळ्या वाळूचा उपसा केला जात आहे. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दिवसाढवळ्या वाळूतस्कार मोठी लूट करत आहे, अशा पद्धतीने शासन गौण खनिजाची मोठी लूट करून प्रशासनाचे यावर नियंत्रण राहिलेले नाहीत.
कोरोना प्रादुर्भावामुळे महसूल प्रशासन, तलाठी, ग्रामसेवक, आदी अधिकारी कामातच व्यस्त असल्या कारणाने याकडे सर्वांचे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. तसेच उक्कलगावमधीलच एक वर्षापूर्वीच गणपती विसर्जनाच्या दिवशीच एका तरुणाचा वाळूतस्कारांनी केलेल्या मोठ्या-मोठ्या खोल खड्ड्यामुळे त्या तरुणाला जीव गमवावा लागला होता. नदीत पाण्याचा प्रवाह कमी झाला असल्यामुळे नदीच्या कडेचा भागातील वाळूचा उपसा करत आहे. त्यामुळे त्या भागातच मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. नदीतच पाणी थोड्या प्रमाणातच असल्यामुळे नदीवर धुणे धुण्यासाठी महिलांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे खड्डयामुळे पाण्याचा अंदाज येत नाहीत.
वाळूच्या उपशामुळे नदीपात्र धोकादायक बनले आहेत. येथील अमरधामचा भाग व नदीचा पूर्वचा भाग वाळूतस्करांनी वाळू उपसा करत मोठे-मोठे खड्डे पडलेले आहे. या गेल्या वर्षीपूर्वीच खड्डयामुळेच घडलेल्या घटनेने दोघा तरूणांचा हकनाक जीव लागल्याची घटना घडली होती.
खंडाळा चौकामधून नवीन रस्त्याच्या मार्गाहून होते वाळूची वाहतूक केली जात असून रात्रंदिवस पिकअप वाहनाच्या साहाय्याने वाळूची लूट केली जात आहे. नवीनच नुकताच रस्ता झाला असून रात्रंदिवस सुरू असलेल्या वाळूच्या चोरट्या वाहतुकीमुळे रस्त्याची चांगलीच वाट लावली आहे. नवीनच रस्त्याला वाळूतस्कारीमुळे मोठे-मोठे खड्डे पडून रस्ता पूर्णपणे खचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here