Beed : जुनामोंढा रोडवर स्मशानभूमी ते एमआयडीसी नाका रस्त्याच्या कामाचा प्रारंभ 

0

नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत कामाची सुरुवात

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
नगरोत्थान योजनेतून मंजूर असलेल्या जुना मोंढा रोडवरील स्मशानभूमी ते एमआयडीसी नाका या रस्त्याच्या कामाला आज प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हे काम सुरू झाले असून यापूर्वी अंडरग्राउंड ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मध्यंतराच्या काळात हे काम थांबले होते परंतु आता हे काम आजपासून सुरू झाले आहे.
सुरुवातीला 500 मीटर काम मंजूर झाले होते. मात्र, आता ते 700 मीटर होणार आहे. आज सोमवारी सकाळी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, सभापती दिनकर कदम अमृत काका सारडा, नितीन धांडे, नगरसेवक विकास जोगदंड, नगरसेवक शुभम धूत, राणा चव्हाण, विष्णुदास बियाणी, अशोक शेटे, संतोष चरखा, विजय लाहोटी, केदार जाजू, शिरीषराव सरवदे, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास मोमीन, कल्याण रायते, लक्ष्मण शेनकुडे, सतपाल लाहोट जयवंत राऊत, फामजी पारीख,श्‍याम भागवत, ईश्वर धन्वे,विशाल मोरे, लाला बनसोडे, नितीन नरवडे, आदी उपस्थित होते.
यावेळी व्यापाऱ्यांच्या वतीने नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉ क्षीरसागर म्हणाले की, या रस्त्याचे काम अत्यंत दर्जेदार आणि भविष्यात वाखाणण्याजोगे होणार आहे. व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर रस्त्यालगत प्रति 15 फुटावर एक झाड असे वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करावे जेणेकरून भविष्यात त्याचा फायदा होईल. हे काम तांत्रिक अडचणीमुळे थांबले होते. मात्र, आता ते पूर्णच होणार आहे. यावेळी व्यापाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here