वृक्षरोपणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

2

राष्ट्र सह्याद्री । श्रीरामपूर:

शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश बोरुडे यांच्या संकल्पनेतून इंदिरा नगर भागातील खंडोबाचे मंदिर या परिसरात वड आणि पिंपळ या 30 वृक्षांचे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. तसेच या वृक्षाची पुढील संगोपनाची सुद्धा जबाबदारी शिवसेनेने उचलली असून ते वृक्ष पूर्ण वाढतील याची हमी बोरुडे यांनी दिली.

दरवर्षी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे वृक्ष किती वाढले याचा अहवाल जनतेसमोर फोटोद्वारे देण्यात येईल असेही त्यांनी जाहीर सांगितले.
या वेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे, शिवसेनेचे जिल्हा संघटक डॉक्टर महेश क्षीरसागर, कमलेश भावसार, उमेश पवार, युवासेना शहर प्रमुख, निखिल पवार, शुभम ताके, गणेश गवारे, अकाश मैड, राहुल भाऊ भोसले, स्वपनिल इंगळे, ऋषिकेश इंगळे, देविदास सोनवणे, सुर्या सकट , शुभम आव्हाड उपस्थित होते.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here