भिज पावसाने उक्कलगावात विहीर कोसळली

 

प्रतिनिधी राष्ट्र सह्याद्री
            श्रीरामपूर : सलग संततधार पडत असणार्‍या भिज पावसाने श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील कोल्हार – रस्ता नजिकचे मुसमाडे वस्तीवरील विश्वनाथ पांडूरंग मुसमाडे गट नंबर 104 यांच्या मालकीची 35 ते 40 वर्षे जुनी विहीर  भिज पावसाने विहिर कोसळली
घराजवळच विहीर असल्यामुळे काहीच जिवितहानी व वित्तहानी झाली नव्हती विहिरी जवळीलच काहीच पत्राचा शेडचा भागच विहीरीत कोसळला होता. विशेष म्हणजे तीन दिवसापासून उक्कलगावात भिज पाऊस सुरू होता ‘त्या’ दरम्यानची,संध्याकाळच्या   सुमारास हिच घटना घडली होती.कामगार तलाठी गवारी यांनी सदरचा पडक्या विहीरची पाहणी करत पंचनामा केला, पंचनाम्यानुसार सदरचा शेतकऱ्याचे साडेतीन लाखाचे रू चे नुकसान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here