Home Health स्मार्ट टेक्‍नॉलॉजी ‘धोकादायक’

स्मार्ट टेक्‍नॉलॉजी ‘धोकादायक’

0
प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
लंडन : स्मार्टफोन अथवा संगणकाच्या सहाय्याने व वायरलेस टेक्‍नॉलॉजीच्या वापराने उपयोगात येणारी स्मार्ट उपकरणे युजर्ससाठी धोकादायक ठरू शकतात, हे संशोधकांनी सिद्ध केले आहे. ही उपकरणे हॅकर्स हॅक करू शकतात व त्यामुळे मोठ्या संख्येने युजर्सना धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा इस्रायलच्या तेलअवीव व्हिजमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व कॅनडामधल्या हेलीफॅक्‍स विद्यापीठातील संशोधकांनी दिला आहे.
अनेक कंपन्या त्यांची उपकरणे स्मार्ट म्हणजे इंटरनेक्‍ट कनेक्‍टिव्हीटीसह दाखल करीत आहेत. स्मार्टफोन सोबतच स्मार्ट लॉक, स्मार्ट बल्ब अशी अनेक उपकरणे बाजारात आली आहेत. ही उपकरणे एकमेकांशी इंटरनेट ऑफ थिग्जच्या माध्यमातून कम्युनिकेशनसाठी उपयुक्त ठरतात. ती संगणक व स्मार्टफोनने नियंत्रित करता येतात.
मात्र, या तंत्रज्ञानातील एक दोष संशोधकांना सापडला आहे. त्यासाठी त्यांनी एका एलईडी बल्बवर प्रयोग केले तेव्हा असे दिसले की हे बल्ब, त्याच्यामागे बसवलेल्या सर्किटला हॅक करून हॅकर्स प्रकाशाचा एक असा पॅटर्न बनवू शकतात ज्यामुळे युजर्सना फिट्‌स येणे किंवा चक्कर येथे असे प्रकार होऊ शकतात. स्मार्ट बल्ब प्रमाणेच स्मार्ट स्वीच, लॉक, थर्मोस्टॅट उपकरणांसाठीही हा धोका आहे.
हॅकिंग करताना हॅकर्स आसपासच्या परिसरात असलेल्या इंटरनेट उपकरणांतही मालवेअर (व्हायरस) पसरवू शकतात व त्यामुळे एकाचवेळी मोठ्या परिसरातील उपकरण युजर्सना त्याचा त्रास होऊ शकतो. अर्थात सदर कंपनीने त्यांच्या बल्बमधील हा दोष दूर केला असल्याचेही सांगितले. मात्र भविष्यात या उपकरणांना हॅकिंगचा धोका आहेच व परिणामी युजर्सनाही हा धोका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here