Shrigonda : विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर ग्रामपंचायतीनेही कारवाई करावी

2

नागरिकांची मागणी
 
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा शहरात श्रीगोंदा नगरपालिका तसेच पोलीस प्रशासन यांच्या वतीने विना मास्क फिरणाऱ्या अनेक लोकांवर कारवाई करण्यात येते. मात्र, गावोगावी अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात विना मास्क फिरताना दिसत आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातील ग्रामपंचायत प्रशासनानेही विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांतून जोर धरताना दिसत आहे.

जगभरात थैमान घातलेला कोरोना व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी सरकारकडून लॉकडाऊन घेण्यात आले. मात्र, काही दिवसात मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत असल्यामुळे लॉकडाऊन हटविण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहरात श्रीगोंदा नगरपालिका तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या वतीने श्रीगोंदा शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. नगरपालिका मार्फत विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तर पोलीस स्टेशन मार्फत विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर भा द वी 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

मात्र, ग्रामीण भागात अनेक गावांत लोक कोरोना व्हायरसला विसरून बिनधास्त फिरताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाचा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याचा दाट संभव आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी ग्रामपंचायत कर्मचारी तसेच पोलीस पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अन्यथा ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होण्यास वेळ लागणार नाही, असेही सज्ञान नागरिकांचे मत आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत व पोलीस पाटील यांनी आपापल्या गावात जर उचित कारवाया केल्या तर कोरोनाला प्रतिबंध घालण्यास नक्कीच मदत होईल, असेही नागरिकांचे मत आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here