Nashik : अबब! पीपीई किट बनवणा-या या कंपनीच्या 44 कर्मचा-यांना कोरोना

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोरोनापासून संरक्षण म्हणून पीपीई किटचा उपयोग होतो. ही पीपीई किट बनवणा-या एका कंपनीच्या तब्बल 44 कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या कंपनीत तयार झालेले पीपीई किट कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. 

नाशिक जिल्ह्यात दिंडोरीतील पालखेड औद्योगिक वसाहतीत पीपीई किट तयार करणारी कंपनी आहे. येथे लॉकडाऊनमध्येही काम सुरू होते. एकाच कंपनीत इतक्या कर्मचा-यांना कोरोना झाल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या कर्मचा-यांना प्रशासनाच्या कोव्हिड सेंटर मध्ये ठेवण्यात आलं आहे. तर कंपनीतील इतर कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

या घटनेमुळे पीपीई किटबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. गेल्या दोन बॅचचे पीपीई किट वापरण्यात येणार का, का या कंपनीत मानवी स्पर्शाशिवाय काम चालते का, या किटमुळे कोरोना युद्धात लढणा-या कोरोना योद्ध्यांचा जीव धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here