Shrigonda Crime : नव-याकडून सतत होणा-या अनैसर्गिक संभोगाला वैतागून पत्नीची पोलीस ठाण्यात धाव

पैशांची मागणी करून छळ केल्या प्रकरणी सासू-सासरे, ननंद, दीरावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | दादा सोनवणे 

श्रीगोंदा तालुक्यातील मूळचे भीमा नदीकाठचे सासर असणाऱ्या एका महिलेने आपल्या नवऱ्याने अनैसर्गिक पणे शारीरिक संभोग केल्यामुळे त्रस्त होऊन त्या महिलेने नवरा, सासू-सासरे, दीर, नणंद तसेच नव-याचे विवाहबाह्य शारीरिक संबंध असणारी महिला यांच्याविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव या ठिकाणचे माहेर असलेल्या एका महिलेला भीमा नदीकाठी असलेल्या आनंदवाडी या ठिकाणी लग्न लावून देण्यात आले होते. मात्र पतीच्या अशा विचित्र मागणीमुळे त्याची पत्नी त्रस्त झाली होती.

याबाबत तिने तिच्या ननंद तसेच सासू-सासरे इतर लोकांना याबाबतची पुसट माहिती दिली होती. तरीही याबाबत फिर्यादीच्या पतीला कोणीही बोलण्यास तयार नव्हते. तसेच तो तिच्याबरोबर अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवत असल्यामुळे जाणीवपूर्वक फिर्यादीचा छळ करू लागले. फिर्यादीला तुझ्या आई-वडिलांकडून मोबाईल शॉपीचा विस्तार करण्यासाठी सुमारे दहा लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करू लागले.

दरम्यान, मध्यंतरीच्या कालावधीत फिर्यादीस आपल्या पतीपासून दिवस गेले. मात्र, हा गर्भ आपणास नको, असे म्हणून जबरदस्तीने गोळ्या चारून गर्भ पाडण्यात भाग पाडले. या सर्व त्रासाला कंटाळून अखेर पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

याप्रकरणी फिर्यादीचा पती, सासू, सासरे, दीर, ननंद, तसेच विवाह बाह्य संबंध असलेली महिला यांच्यावर भा द वि 377, 498अ ,315, 109,504,506 ,34 प्रमाणे बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने हे करत आहेत.

महत्वाची नोंद

फिर्यादी गीतांजली शामराव बांदल यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नजरचुकीने बातमीत पूनम स्वप्नील शिंदे यांचे नाव आल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण झाला आहे. तरी याबाबत दैनिक राष्ट्र सह्याद्री गिरमकर व शिंदे कुटुंबियांची दिलगिरी व्यक्त करत आहे, यांची नोंद घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here