Shrigonda : तालुक्यातील राजापूर परिसरात बिबट्या अडकला 

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यातील राजापूर येथील मेंगलवाडी परिसरातील अशोक मांडगे यांच्या शेतात लावलेल्या जाळीत बिबट्या जेरबंद झाला असून या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. दोन दिवसापूर्वी मेंगलवाडी परिसरातील शेतकऱ्याच्या पाळीव कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडला होता. परिसरातील शेतकऱ्यांना बिबट्या बरोबरच रानडुकरांचा मोठा त्रास होत होता. उभे पीक रानडुक्कर रात्रीच्या वेळेस खाऊन टाकत असल्याने मंगलवाडी शिवारातील अशोक मांडगे आणि उल्हास मांडगे या शेतकऱ्यांनी रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी शेताच्या कडेला जाळीचे कंपाऊंड केले होते.
या जाळीच्या कंपाऊंडमध्ये आज दुपारी रानडुकरांऐवजी बिबट्या जेरबंद झाला. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी या बिबट्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याची माहिती दिली. बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी समजताच परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरातील नागरिकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here