Sangamner : धक्कादायक! प्रवरा नदीपात्रात उघड्यावरच वैद्यकीय कचर्‍यासह पीपीई किट, हाता-पायाचे मोजे व रुग्णांचे कपडे फेकले…

प्रतिनिधी | विकास वाव्हळ | राष्ट्र सह्याद्री 

प्रवरा नदी पात्रालगत असलेल्या संगमनेर शहराच्या वैकुंठधाम (स्मशान-भूमी) जवळील परिसरातील प्रवरानदीवरील पुलाजवळ वापरलेल्या पीपीई किट्स, हात मोजे व अन्य वैद्यकीय वस्तू रुग्णांचे वापरातील कपडे उघड्यावर फेकण्यात आले आहेत. या वस्तू टाकणाऱ्या रुग्णालयांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. हा प्रकार म्हणजे, संगमनेरकरांच्या सार्वजनिक आरोग्यवर केलेला एक प्रकारचा हल्ला आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

संगमनेर शहर व तालुक्यात या महिन्यात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दिवसागणित वाढत आहेत. या रुग्णांवरील उपचारात व्यत्यय येऊ नये. यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना कोरोना बाधितांवर उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहर व परिसरातील डॉक्टरांनी आपल्या रुग्णालये सुरू करून पुन्हा रुग्ण तपासणी सुरू केली. रुग्ण तपासणी करताना आपल्याला कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून, या सर्व डॉक्टर्स पीपीई किट, हातमोजे, पायमोजे, डोक्यावरील कॅप अशा सर्व वस्तूंचा वापर सुरू केला आहे.

या वस्तू फक्त एकदाच वापरल्या जातात. दिवसभर या  किट व इतर वस्तू वापरल्यावर नंतर या सर्व वस्तू नष्ट कराव्या लागतात असे आदेश आहेत. त्यासाठी शासनाने नियम केले आहेत. परंतु येथील काही रुग्णालयांकडून मात्र त्याची अंमलबजावणी व्यवस्थित केली जात नाही. असे या प्रकारावरून दिसून येत आहे. हे वापरलेले साहित्य सार्वजनिक ठिकाणी उघड्यावरच टाकून देण्याचा प्रकार हा नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे हा प्रकार संवेदनाहीन आहे. हा प्रकार म्हणजेच माणुसकीला कळीमा फासणारा आहे. या प्रकारामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला असून कारवाईची मागणी केली आहे. या कृत्याने सार्वजनिक आरोग्यावरच घाला घातल्यात आला आहे. असा आरोप ही नागरिकांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here