Unlock 3 : योग इन्स्टिट्यूट आणि जीम सुरू करण्यास 5 ऑगस्टपासून परवानगी

गृहमंत्रालयातून ‘अनलॉक-3’च्या गाईडलाईन्स जारी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

येत्या 31 जुलैला अनलॉक 2 संपत आहे. 1 ऑगस्टपासून अनलॉक 3 सुरु होत असून केंद्र सरकारकडून अनलॉक 3 च्या गाईडलाईन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोरोनाचे कडक नियम पाळून योग इन्स्टिट्यूट आणि जीम सुरु करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. 

तसेच येत्या 15 ऑगस्टला स्वतंत्रता दिवस आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळून कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परवानगी दिली आहे.

अनलॉक 3 मध्ये या गोष्टी राहणार बंदच

– शाळा, कॉलेज आणि सर्व शैक्षणि संस्था 31 ऑगस्ट 2020 पर्यंत बंदच राहातील

– चित्रपट गृह, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, बार, ऑडिटोरियम, असेंब्ली हॉल, अशा प्रकारच्या सर्व ठिकाणांवर बंदी असेल.

– गृह मंत्रालयाने दिलेल्या परवानगीशिवाय सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी कायम असेल.

– मेट्रो रेल्वे सेवेवरही बंदी कायम राहील.

– सामाजिक/ राजकीय/ क्रीडा/ मनोरंजन/ शैक्षणिक/ सांस्कृतिक/ धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांवरही बंदी कायम असेल.

कंटेन्मेंट झोन परिसरात 31 ऑगस्टपर्यंत कडकडीत लॉकडाऊन

दरम्यान, कंटेन्मेंट झोन परिसरात 31 ऑगस्टपर्यंत कडकडीत लॉकडाऊन असेल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. कंटेन्मेंट झोव परिसरात फक्त अत्यावश्यक सुविधा सुरु राहतील. केंद्रीय गृह खात्याकडून कंटेन्मेंट झोनबाबत महत्त्वाच्या गाईडलाईन्स जारी करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here