Rahuri : पाच रुपयांची नोट व्यापाऱ्यांनी केली बंद

0

‘त्या’ व्यापाऱ्यां विरोधात कारवाई कोण करणार ?

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री | राजेंद्र उंडे

देवळाली प्रवरा व राहुरी कारखाना येथील व्यापाऱ्यांनी स्वयंघोषणा करुन चलनातील पाच रुपयांची चालू नोट चलनातून बंद करून गव्हर्नरचे अधिकार स्वतःच्या अधिकारात घेतले आहेत.

राहुरी कारखाना येथील मुसमाडे पेट्रोल पंपावर पञकार राजेंद्र उंडे पेट्रोल भरण्यासाठी गेले असता 510 रुपयांचे पेट्रोल घेतले त्यात पाच रुपयांच्या दोन नोटा दिल्या असता पंपावरील कामगारांनी या नोटा बंद झाल्या आहेत असे सांगितले. नोटा स्वीकारणार नाही. त्या कामगाराने नोटा स्वीकारल्याच नाही. नोटा बंद करण्याचा अधिकार गव्हर्नर ऐवजी व्यापाऱ्यांनी हातात घेतला आहे. चलनी नोटा बाद ठरवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई होणार का ?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळाली प्रवरा व राहुरी कारखाना येथील बाजारापेठेत व्यापाऱ्यांनी चलनी नोटातील पाच रुपयांची नोट व्यवहारातून बाद केली असल्याने ग्राहकांची डोकेदुखी ठरत आहे. बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी ग्राहकाने पाच रुपयाची नोट दिली तर हि बंद झाली आहे.चलनातून नोट बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पिच रुपयाची नोट स्वीकारु शकत नाही. असे स्पष्टपणे व्यापारी ग्राहकांना सांगत आहेत. ग्राहकांपुढे मोठी अडचण निर्माण होत आहे.

पाच रुपयाची नोट बंद झाली तर या नोटीचे करायचे काय यावर काही व्यापारी यांनी मोलाचा सल्ला दिला फाडून फेकून द्या म्हणजे पुन्हा बाजार पेठेत येणार नाही. चलनातून नोटा बंद करण्याचा अधिकारा गव्हर्नर यांना असतानाही गव्हर्नरच्या अधिकारावर गदा आणून व्यापाऱ्यांनी पाच रुपयाची नोट स्वयंघोषणा करुन बंद केली आहे.

राहुरी कारखाना येथील मुसमाडे पेट्रोल पंपावर पञकार राजेंद्र उंडे पेट्रोल टाकण्यासाठी गेले असता. 510 रुपयांचे पेट्रोल घेतले पाचशे रुपयांची एक नोट व पाच रुपयांच्या दोन नोटा दिल्या असता पाच रुपयांच्या नोटा घेत नाही असे सांगितले.त्यावर पञकाराने पाच रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या का असा प्रश्न विचारला असता पाच रुपयांच्या नोटा बंद केल्या आहेत. असे सांगितले.बँकेत तर या नोटा स्वीकारल्या जातात असे सांगितले असता. आमच्या कडून कोणी घेत नाही. परंतु पञकार उंडे यांनी काही वेळा पूर्वीच एका दुकानदाराने या पाच रुपयांच्या नोटा दिल्या त्या स्वीकारल्याही असे सांगितले असता तुम्ही घ्या त्याची रद्दी करा पण आम्ही पाच रुपयांच्या नोटा स्वीकारु शकत नाही.आणि स्वीकारणार नाही. असे स्पष्ट सांगितले. यावरुन गव्हर्नरच्या आधीच व्यापाऱ्यांनी पाच रुपयाच्या चलनातून हद्दपार करण्यासाठी स्वयंघोषणा केली आहे.

चालू चलनातील पाच रुपयांच्या नोटा बंद करण्याचा अधिकार व्यापाऱ्यांना कोणी दिला. पाच रुपयांच्या नोटा चलनातून बंद करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई कोण करणार? पाच रुपयांच्या नोटांमुळे बाजारपेठेत ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नागरीकांनी आर.बी.आय कडे तक्रार करावी; खाडे
बाजारपेठेत पाच रुपायची नोट व 10 रुपयांचे क्वाईन स्वीकारले जात नसल्याच्या तक्रारी येत आहे. परंतू गव्हर्नरने पाच रुपयांची नोट व 10 चे क्वाईन बंद केलेले नाही आजही सर्व बँका पाच रु.नोट व 10 रुपयांचे क्वाईनची देवान घेवाण करत आहे.

बाजारपेठेत जो व्यापारी पाच रु.नोट व 10 रुपयांचे क्वाईन स्वीकारणार नाही.त्या व्यापाऱ्याच्या नावानीशी आर.बी.आय कडे तक्रार दाखल करावी. तक्रार दाखल करण्यासाठी स्टेट बँकेतून मेल आय डी किवा कार्यालयाचा पत्ता दिला जाईल. नागरिकांनी तक्रार दाखल केल्यास व्यापाऱ्यांना पाच रु.नोट व 10 रु. क्वाईन स्वीकारावे लागेल. नाहीतर त्या व्यापाऱ्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो.

– रणजित खाडे, शाखा अधिकारी, स्टेट बँक देवळाली प्रवरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here