‘दहावी बारावीचा तेरावा घातला’, दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याकडून नव्या शैक्षणिक धोरणाचे स्वागत

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

काल दहावीचा निकाल जाहीर झाला. त्याच दिवशी केंद्र सरकारने देशाच्या शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल करीत असल्याचे जाहीर केले. इथून पुढे 10+2 ची पद्धत रद्द करून 5+3+3+4 हे धोरण अमलात येणार आहे. यावर आता वेगवेगळ्या क्षेत्रातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या नव्या शैक्षणिक धोरणाचे स्वागत करीत शिक्षण पध्दती बदलली. आनंद आहे.. आता मुलांची रॅट रेस संपवा. जगू द्या त्यांना. कधी कधी वाटतं पालकांची परीक्षा घ्यायला हवी. तसाही त्यांचा अभ्यास झालेलाच असतो,” असं केदार शिंदे यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here