SSR Sucide Case : सुशांतच्या बहिणीसोबत रिया चक्रवर्तीचे होते वाद!

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सुशांतच्या बहिणीचे रिया चक्रवर्तीसोबत अनेक वाद होते, असे पाटणा पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी त्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रियावर या आधीच गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या विरोधात रियाने सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती.

आता सुशांतच्या नोकर दीपेश मिरांडा आणि त्याचा गार्ड यांची काल चौकशी करण्यात आली. यात आणखी एक माहिती समोर आली आहे. दीपेशच्या म्हणण्यानुसार रिया आणि सुशांतची बहिण यांच्यामध्ये खूप वाद होते. त्या दोघींचे भांडण देखील झाले होते.

दरम्यान, रियाची चौकशी करण्यासाठी पाटणा महिला पोलिसांचं पथक मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाटणा एसएसपी उपेंद्र कुमार शर्मा मुंबई पोलिसांच्या संपर्कात आहेत. पाटणा पोलीस रियाच्या कुटुंबियांचीही चौकशी करणार आहेत. तर रियाच्या वडिलांनी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात अपिल केले आहे. ख्यातनाम वकील सतीश मानेशिंदे यांनी रियाचे वकीलपत्र घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here