नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये…

अॅड.शिवानी संभाजी झाडे – (LL.B. LL.M.ः९७६६३७६४१७)

हक्क आणि कर्तव्ये या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे आपण शाळेत असताना शिकलो आहोत आणि जिथे हक्क असतात तिथे कर्तव्ये असतातच. आपल्या संविधानामध्ये हक्क आणि कर्तव्ये सांगितलेली आहे. संविधानात सुरुवातीलाच स्वातंत्र्य ,समता, बंधुता,न्याय,एकता, एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद,लोकशाही या सर्व गोष्टींचा समावेश केलेला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्काबाबत माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याने आपल्या कर्तव्याबाबत जागरूक असणे गरजेचे आहे. म्हणूनच आपण अशा हक्कांची व कर्तव्यांची माहिती कायद्यांतर्गत थोडक्यात करून घेऊ.

भारतीय संविधानाच्या भाग-३ मध्ये मूलभूत हक्क आणि अधिकार दिलेले आहे. त्याचबरोबर कर्तव्यही संगितली आहे. आज बऱ्याच लोकांना संविधानाबाबत माहिती नाही. त्यामुळे त्यांना आपले हक्क आणि कर्तव्ये माहिती नाही. मानवी हक्क म्हणजेच सर्वांना समान प्राप्त झालेले मूलभूत अधिकार, जे कोणत्याही जात, धर्म, राष्ट्रीयत्व, वर्ण, लिंग यावर अवलंबून नाही. या कोणत्याही गोष्टींमध्ये भेदभाव न करता सर्व प्राप्त झालेले असतात.

आपण दरवर्षी १०डिसेंम्बर हा *मानवी हक्क* दिवस म्हणून साजरा करतो.सर्व लोकांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे,त्यांना सन्मानपूर्वक समाजात जगता यावे यासाठी संविधानात तरतूद आहे.संविधानामध्ये६प्रकारचे मूलभूत हक्क अनुच्छेद १२ते३२मध्ये आहेत.त्यामध्ये१.अनुच्छेद १४मध्ये *समतेच्या अधिकाराचे* वर्णन केले आहे.प्रत्येकाला समान वागणूक आहे कोणताही भेदभाव केला जात नाही.अनुच्छेद १५ते१७ मध्ये दिल्याप्रमाणे कोणत्याही नागरिकांवर धर्म,जात,वंश,लिंग, जन्मस्थान किंवा कोणत्याही कारणावरून हॉटेल,उपहारगृहे,दुकाने इ.वरून बंधने लादता येणार नाही.तसेच धर्म,वंश,जात कोणत्याही कारणावरून भेदभाव न करता नोकरीची समान संधी मिळाली पाहिजे असं यात नमूद करण्यात आले आहे.
२. अनुच्छेद१९ते२२ च्या अंतर्गत *स्वातंत्र्याचा अधिकार* देण्यात आला आहे. यामध्ये१९-A नुसार प्रत्येकाला कोठेही भाषण करून किंवा वेगवेगळ्या कृतींतून आपले विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. तसेच त्यामध्ये माहितीचा अधिकार देखील आहे. १९-G नुसार कोणत्याही व्यक्तीला त्याच्या उपजीविकेसाठी कोणताही व्ययवसाय करून पैसे मिळवण्याचा हक्क आहे.सर्वात महत्वाच अनुच्छेद २१नुसार प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार आहे.
३.अनुच्छेद २३व २४ नुसार *पिळवणुकीविरुद्धचा अधिकार* देण्यात आला आहे. म्हणजेच कोणत्याही स्त्री, पुरुष,बालक यांचा वस्तू म्हणून वापर करता येणार नाही तसेच एखाद्याला कमी पैसे देऊन जास्त काम घेण्यासाठी विरोध आहे. अनु.२४ प्रमाणे १४ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांकडून काम करून घेणे हा गुन्हा ठरवला जातो.
४. तसेच अनुच्छेद.२५ते२८च्या अंतर्गत *धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार* आहे.म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला तिच्या इच्छेनुसार कोणत्याही धर्माचे आचरण,पालन,प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे.पण त्यासाठी काही गोष्टी अपवाद देखील आहे.
५.अनुच्छेद२९व३० मध्ये सर्वाना *शैक्षणिक अधिकार* देण्यात आले आहे.
६.आणि ३२ मध्ये काही *घटनात्मक उपाययोजनेच्या* हक्कांचा समावेश केलेला आहे.
मूलभूत हक्क ज्याप्रमाणे माहिती पाहिजे त्याचप्रमाणे मूलभूत कर्तव्यांची जबाबदारी आपल्याला पाहिजे. मूलभूत कर्तव्ये ही घटनेमध्ये भाग-४,अनुच्छेद५१-A मध्ये सांगितलेले आहे. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य पार पाडणे हे पण एक कर्तव्यच आहे.१.प्रत्येक नागरिकाने आपल्या *राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा* आदर केला पाहिजे.
२.स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेल्या आदर्शचा अभिमान बाळगला पाहिजे.
३.राष्ट्राचे *सार्वभौमत्व व एकात्मता* यांचे संरक्षण केले पाहिजे.
४.सर्वात महत्वाचे म्हणजे देशाचे रक्षण करणे व गरज असल्यास धावून जाणे.
५.बंधुभाव जपणे.
६.आपल्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा व वारशाचे जतन करणे.
७.तसेच नद्या,तळे,सरोवरे,जंगले यांसारख्या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करणे.
८.वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद यांचा विकास करणे.
९.तसेच प्रत्येकाने आपल्या सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण केले पाहिजे.
१०.आपल्या देशाला वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
११.प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्ये आहे.
अशाप्रकारे प्रत्येक व्यक्तीने आपल्या हक्कांबाबत जागरूक असले पाहिजे व त्याचबरोबर आपले कर्तव्ये ही जबाबदारीने पार पाडले पाहिजे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here