धक्कादायक कोरोना चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅबची तपासणी; कर्मचा-याला अटक

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अमरावती जिल्ह्यात कोरोना चाचणीसाठी एका 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी संबंधित कर्मचा-याला अटक करण्यात आली असून त्यावर बलात्कार तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही तरुणी एका अमरावतीतील एका मॉलमध्ये जॉब करते. या मॉलमधील एका कर्मचा-याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील 20 जणांचे स्वॅब ट्रामा केअर सेंटर या लॅबमध्ये घेण्यात आले. मात्र स्वॅब घेणाऱ्या आरोपी अल्पेश देशमुखने संबंधित मुलीला परत बोलावून तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, तुम्हाला युरिनल तपासणी करावी लागेल, असे सांगितले.

यावर तरुणीने आपल्या वरिष्ठ महिला सहका-याला ही गोष्ट सांगितली. त्या दोघींनी स्वॅबसाठी महिला कर्मचा-याबात विचारणा केली. मात्र, महिला कर्मचारी नसल्याचे सांगत तुम्ही तुमच्यासोबत आणखी एका महिलेला घेऊन या असे सांगितले. त्यानंतर या तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब आरोपी टेक्निशिअनने घेतले. त्यानंतर तुमची चाचणी निगेटिव्ह असल्याचे आरोपी कडून सांगण्यात आले.

मात्र, या सर्व प्रकाराबाबत तरुणीला शंका येऊन तिने आपल्या भावाला याबाबत सांगतले. याप्रकरणी डॉक्टरांना विचारले असता अशा प्रकारे युरिन स्वॅबची गरज नसते, असे कळविण्यात आले. त्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली.

संबंधित टेक्निशिअनला पोलिसांनी बलात्कार व अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here