गोरक्षक शिवशंकर स्वामी यांना पुन्हा पोलीस संरक्षण

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
शिक्रापूर : महाराष्ट्रामध्ये गोहत्येबाबत आवाज उठवीत स्वतःचा जीव धोक्यात घालत असंख्य गोवंशाचे जीव वाचविणार्‍या मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना पुन्हा सशस्त्र पोलीस संरक्षण पुरविण्यात आले असल्यामुळे गोराक्षकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्रामध्ये गोरक्षणाचे काम करणार्‍या शिवशंकर स्वामी यांनी अनेक ठिकाणी गोवंशाची होणारी कत्तल उघडकीस आणून तसेच कत्तलीसाठी जाणार्‍या हजारो गोवंशांची सुटका केलेली आहे तसेच असंख्य कसायांवर गुन्हे दाखल केलेले असून त्याबाबतची न्यायालयीन लढाई देखील स्वतः लढत आहेत. पुणे शहरासह ग्रामीण भागात देखील स्वामी यांनी अनेक गोवंशाना कत्तलीपासून जीवदान दिले असून ग्रामीण भागात देखील गोरक्षक निर्माण केले आहे.
स्वामी यांच्या कार्यामुले त्यांच्यावर यापूर्वी अनेक जीवघेणे हल्ले झालेले असताना त्यांना शासनाकडून निशुल्क पोलीस संरक्षण पुरविण्यात आलेले होते, मात्र काही दिवसांपूर्वी अचानकपणे स्वामी यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आलेले होते त्यामुळे स्वामी यांच्यावर मोठे संकट उभे राहिलेले असताना महाराष्ट्रातील अनेक गोरक्षकांनी स्वामी यांना पोलीस संरक्षण पुरविण्यात यावे याबाबत शासनाला निवेदने दिले होते. तसेच महाराष्ट्र पशु कल्याण कायदा समिती यांनी देखील शासनाकडे पाठपुरावा करून शिवशंकर स्वामी यांना पोलीस संरक्षण पुरविण्यासाठी पाठपुरावा केला होता.
त्यांनतर शासनाकडून शिवशंकर स्वामी यांना पुणे ग्रामीण विभागासाठी निशुल्क सशस्त्र पोलीस संरक्षण पुरविण्यात आले असून त्याबाबत पत्र देखील स्वामी यांना देण्यात आले असून संरक्षण देखील नेमण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गोराक्षकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत असून याबाबत बोलताना यापुढे मोठ्या जोमाने गोराक्षनाचे कार्य करण्यात येणार असून मिळालेले संरक्षण हे सर्व गोराक्षकांच्या पाठपुराव्याला यश असल्याचे शिवशंकर स्वामी यांनी सांगितले आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here