गुगलचे ‘वर्षभर’ वर्क फ्रॉर्म होम

0
नवी दिल्ली – भारत आणि जगभरातील गुगलच्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करू देण्यासाठी गुगल कंपनीने 30 जून 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
कर्मचाऱ्यांना मानसिक आणि तंत्रज्ञानविषयी तयारी करता यावी म्हणून दीर्घ पल्ल्याचा आराखडा जाहीर केला असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.
कंपनीचे 2 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. वर्क फ्रॉम होमसाठी आवश्‍यक उपकरणे विकत घेता यावी याकरिता 1000 डॉलर म्हणजे 75 हजार रुपयांचा भत्ता कर्मचाऱ्यांना देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here