Newasa : गिरणी चालक महिलेच्या दाळ व बेसन मिलचा रस्ता गावगुंडांकडून बंद

महिलेकडून रस्ता खुला करण्यासाठी तहसिलदारांना साकडे

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथील अलका सोन्याबापू पवार यांच्या दाळ व बेसन मिलकडे जाणारा रस्ता गावातील काही ‘दादागिरी’ करणाऱ्या लोकांनी बंद केल्यामुळे या महिलेच्या मिलचा व्यवसाय बंद पडला असून रस्ता बंद करणाऱ्यांवर कडक कारवाई करुन रस्ता खुला करण्याचे लेखी मागणी नेवासा तहसिलदारांकडे या महिलेने केली आहे.

याबाबत तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात पवार यांनी पुढे म्हटले आहे की, आम्ही तामसवाडी या गावी राहत असून शेती व दाळ मिलचा व्यवसाय करत आहे. गावातील काही लोक विनाकारण ञास देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आमच्या कुटूंबियांना ञास देत असून आता तर त्यांनी आमच्या वस्तीकडे येणारा रस्ताच बंद केल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आणली आहे.
ज्यांनी रस्ता बंद केला त्यांचा या रस्त्याशी काहीही संबंध नसून आम्ही नेवासा पोलिस व तहसिलदारांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे व विनाकारण रस्ता बंद करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नेवासा तहसिलदारांडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here