Shrigonda : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी भाजपचे १ ऑगस्टला रास्ता रोको…

आमदार बबनराव पाचपुते यांची पत्रकार परिषद

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी २० जुलै रोजी विक्रमसिंह पाचपुते यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्रीगोंदा तहसिल कार्यालयाबरोबर जिल्हाधिकारी अहमदनगर यांना दूध दरवाढी संदर्भात निवेदन देण्यात आले होते. मात्र, याबाबत निर्णय न झाल्याने १ ऑगस्ट रोजी भाजपच्या एल्गारच्या वतीने श्रीगोंदा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथे निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संदीप नागवडे भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष रायकर, युवा नेतृत्व विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

तत्कालीन भाजपा सरकारकडून दुधाची दरवाढ तीन वेळेस करण्यात येऊन शेतकऱ्यांचा दुधाला रुपये ३४ ते ३५ रुपयापर्यंत बाजार मिळाला होता. आज दुधाला फक्त १८ ते २० रुपये प्रतिलिटर बाजार दिला जात असून, यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. सरकारने तातडीने किमान प्रतिलिटर १० रूपये अनुदान द्यावे. तसेच दूध पावडरला रुपये ५० अनुदान दिल्यास शेतकऱ्यांना किमान रुपये ३० प्रतिलिटर दर मिळावा.

शासनाने शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे त्वरीत उपलब्ध करून द्यावीत, शेतकऱ्यांचा सातबारा त्वरीत कोरा करावा, शेतकऱ्यांची वीज बिले माफ करावेत, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा शेतीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी तसेच या आंदोलनात सर्व दूध उत्पादक शेतकरी दूध संकलन केंद्र चालक मालक यांनी पाठिंबा देऊन आपला सहभाग नोंदवावा तसेच सध्या श्रीगोंदा तालुक्यातील कोविड-19 विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे येत्या चार ते पाच दिवसांत सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्रीगोंदा येथे बैठक आयोजित करणार असून, या बैठकीमध्ये कोरोनाचा आढावा घेत संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना करण्याबाबत चर्चा करणार असल्याचे पाचपुते यांनी सांगितले आहे.
तसेच या आंदोलनाला सर्वांनी हजेरी लावावी व आंदोलना हिंसक वळण लागणार नाही याची सर्व आंदोलकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन आमदार पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत केले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here