अधिकारी, कर्मचारी व डॉक्टरही कोरोनाच्या कचाट्यात!

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
सोनई पोलिस ठाण्याच्या एका पोलिस अधिकाऱ्यानंतर एक आरोपी कोरोनाच्या जाळ्यात अडकल्यामुळे नेवासा येथील कारागृहात असलेल्या २१ आरोपींना कोरोनाची बाधा झालेली असून पाच पोलिस कर्मचारीही आता कोरोनाची शिकार बनले आहेत. नेवाशात पोलिस अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर नंतर नेवासा कारागृहातील २१ आरोपींना कोरोनाची बाधा झालेली असून नेवासा न्यालयातील एका खासगी वकीलाचा कारकूनही आता कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने नेवाशात कोरोना या संसर्ग आजाराने मोठा धुमाकूळ घातला आहे.
तालूका आरोग्य विभाग कोरोनाला मुठमाती देण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतांना दिसून येत असून सर्वसामान्य नागरिक बेकदरपणे वावरत आसल्याने कोरोना आटोक्यात येण्याऐवजी त्याचा फैलाव वाढत आसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेवासा तालूक्यात राजकिय नेत्यांपासून पोलिस अधिकारी,कर्मचारी,डॉक्टर व आरोपींनाही कोरोनाची बाधा झाल्याने तालूक्यात कोरोना या संसर्ग आजाराने मोठा धुमाकूळ घातला आहे.
कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी नेवासा तहसिलदार रुपेशकुमार सुराणा,आरोग्य अधिकारी डॉ अभिराज सुर्यवंशी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. माञ, बाहेर फिरणारी जनता काळजी घेत नसल्याने कोरोना आटोक्यात येण्याऐवजी त्याचा फैलाव होत असल्यामुळे चिंतेचे सावट नेवासकरांवर येऊन बेतले आहे.