Newasa : उसने दिलेल्या पैशामुळे एकाचे अपहरण करुन मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक, एक फरार

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील राहणाऱ्या संदीप बोडखे याला दोन वर्षापूर्वी एक लाख रुपये उसने दिल्याच्या कारणावरुन नेवासा फाटा येथील किरण रघूनाथ शिरसाठ, मनोज गुंजाळ आणि बबलू शिरसाठ यांनी संदीप बोडखे याला पळवून आणून नेवासा फाटा येथील आंबेडकर चौकात मारहाण करून पैसे दिल्यानंतर सोडून देऊ अशी धमकी दिली. याप्रकरणी संदीप बोडखे यांच्या पत्नी राणी बोडखे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण रघूनाथ शिरसाठ व मनोज गुंजाळ या दोन आरोपींना नेवासा पोलिसांनी अटक केली आहे. बबलू शिरसाठ माञ फरार झाला आहे. या अटक करण्यात आलेल्या दोघा जणांना नेवासा न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर गुरुवार (दि ३०) रोजी हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, टाकळीभान (ता.श्रीरामपूर) येथील संदीप बोडखे याने दोन वर्षापूर्वी किरण रघूनाथ शिरसाठ याच्याकडून एक लाख रुपये उसने घेतले होते. त्यापैकी काही पैसे त्याने आरोपी शिरसाठ याला परत दिलेले होते. माञ काही राहिलेल्या पैशांमुळे तगादा चालू होता. त्यामुळे टाकळीभान येथील विनोद मगर याच्या बरोबर फिर्यादीचा पती संदीप बोडखे नेवाशाला जाऊन येतो, असे सांगून गेलेला होता.
माञ दि. २६ जुलैला रात्री ११ वाजेपर्यंतही तो घरी आलेला नसल्यामुळे पत्नीनेही विचारपूस सुरु केली. शेजारच्या बाईच्या मोबाईलवर पळवून नेलेल्या नवऱ्याचा फोन आला तू त्यांच्याकडून घेतलेल्या पैशाची व्यवस्था लवकर कर, मला ते खूप मारहाण करत आहेत, असे सांगितले. त्यामुळे आरोपीही त्याच्या पत्नीशी बोलले तुम्ही पैशाची व्यवस्था करा. त्याला आम्ही सोडणार नसल्याची धमकी दिली. त्यामुळे राणी बोडखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी किरण रघूनाथ शिरसाठ व मनोज गुंजाळ यांना अटक केली. यातील बबलू शिरसाठ हा आरोपी फरार झाला आसून अटक करण्यात आलेल्या दोघा जणांना पाच दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here