Karjat : तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी गाठली शंभरी, कर्जत @ १०१

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि ३०

कर्जत : कर्जत तालुक्यात गुरुवारी १४ कोरोनाबाधित नवीन रुग्ण सापडले असून तालुक्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येने शंभरी गाठली आहे. कर्जत तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या आता १०१ झाली असल्याची माहिती तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे. तर गुरुवारी दोन कोरोनाबाधित रुग्णाचा उपचार घेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. 

कर्जत तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या दिवसें-दिवस वाढतच चालली असून प्रशासनाद्वारे येणारे आकडे नागरिकांना निश्चित चिंता व्यक्त करणारे ठरत आहे. बुधवारी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने उंच्चाक गाठला होता. एकाच दिवशी तब्बल २४ रुग्ण मिळाले होते. गुरुवारी पुन्हा द्वि आकडी संख्या कायम राहिली. आज संध्याकाळी १४ नवे रुग्ण कर्जत तालुक्यात सापडले असून यामध्ये राशीन ८, कुळधरण ४ आणि देशमुखवाडी २ येथील कोरोनाबाधीत रुग्णाचा समावेश आहे. तर उपचार घेत असताना थेरवडी येथील ३४ वर्षीय युवक तर कुळधरण येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कर्जत तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाने शंभरी गाठली असून कोरोनाबाधित रुग्णाची एकूण संख्या १०१ झाली आहे. यामध्ये कर्जत शहरात ९ तर ग्रामीण भागात ९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. यामधील ८ रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या वतीने कर्जत तालुक्यात एकूण ९३ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले असून यामध्ये शहरातील ८ आणि ग्रामीण भागातील ८५ परिसर कोरोना प्रतिबंधित म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here