Shrirampur : खैरी निमगांवात पुन्हा कोरोनाची एन्ट्री

1

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

खैरी निमगांव येथील २३ वर्षीय तरूणी कोरोना मुक्त झाल्यानंतर पुन्हा ३३ वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने गावात पुन्हा कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. श्रीरामपूर येथील आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या १०३ रॅपीड टेस्टमध्ये श्रीरामपूर तालुक्यात २१ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. विशेष म्हणजे यात दोन पोलिसांचा समावेश आहे.

रॅपीड टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या गावातील सात जणांची आज तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश धापते यांनी दिली. गावातील ज्या परिसरात रुग्ण आढळला त्या परिसरात तत्काळ सॅनिटायझर फवारणी तसेच जंतुनाशक फवारणी करण्यात येणार आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here