Shrigonda Crime : एकाच रात्रीत तीन मेडिकल, एक पशुखाद्याचे दुकान फोडले

0

किरकोळ मुद्देमाल चोरीला

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यातील चोरट्यांनी आता आपला मोर्चा वैद्यकीय व्यवसायिकाकडे वळविला असल्याचे चित्र श्रीगोंदा शहरात पाहण्यास मिळाले. अज्ञात चोरटयांनी मेडिकल दुकाने फोडून किरकोळ सामान चोरून नेल्याची घटना श्रीगोंदा शहरात घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

श्रीगोंदा शहरातील मध्यरात्रीच्या सुमारास  (दि30जुलै ते 31जुलै) च्या रात्री शहरातील मुख्य रस्त्यावर असणारे तीन मेडिकल चोरट्यांनी फोडले आहेत. दौंड जामखेड रस्त्यावरील भैरवनाथ मेडिकलचे शटर उचकटून मेडिकल मधील 35 हजार रु रोख रक्कम, 1200रु की ची सौंदर्य प्रसाधने 700रु किंमतीचे कॅटबरीचे बॉक्स असा एकूण 36 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केला आहे. सदर चोरीबाबत हेमंत हिरडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चोरट्यांनी कुठलाही पुरावा मागे राहू नये यासाठी मेडिकल शेजारी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे वळवून ठेवले होते. शहरातील शुभम व शिवम या मेडिकलमध्ये देखील किरकोळ चोरी झाली आहे. तर आढळगाव येथील सिद्धेश्वर पशुखाद्य हे दुकान फोडत 10 हजार रु रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. अशा प्रकारे मेडिकल व पशुखाद्य व्यावसायिकांना आता चोरांनी टार्गेट केले आहे, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रोहिदास झुंजार हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here