shrigonda : बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी ठार

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – तालुक्यातील राजापूर येथे एक बिबट्या शेतात लावलेल्या जाळयात अडकला होता. मात्र, याच गावाजवळ असलेल्या येळपणे या गावात बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. यात एक मेंढी बिबट्याने खाल्ली तर उरलेल्या पाच ते सहा मेंढ्या जखमी केल्या आहेत. तर काही मेंढ्या मरण पावल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आण्णा नाना कोळपे रा. ठाणगे वाडी, येळपणे या मेंढपाळच्या या मेंढ्या होत्या. बिबट्याने रात्री त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात एक मेंढी त्याने फस्त केली तर काही मेंढ्या जखमी झाल्या आहेत. वन विभागाने एकच मेंढी मेल्याचा पंचनामा केला आहे. मात्र घटनेत काही मेंढ्या मरण पावल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here