राज ठाकरे म्हणाले, राम मंदिराचं भूमिपूजन धूमधडाक्यातच व्हायला हवं, पण…

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राम मंदिराचं भूमिपूजन धूमधडाक्यातच व्हायला हवं पण ही ती योग्य वेळ नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे अतिशय चांगली गोष्ट असून याचा आनंद आहे, असेही ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राम मंदिराच्या भूमिपूजन या विषयावर भाष्य केलय. येत्या 5 ऑगस्टला राम मंदिराचं भूमिपूजन व शिलन्यास कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, सध्या कोरोनाचे संकट आले आहे. अशा परिस्थितीत भूमिपूजन कार्यक्रमापेक्षा कोरोना समस्येकडे पंतप्रधानांनी जास्त लक्ष द्यावे असा सल्ला दिला होता. यावरून बरीच चर्चाही झाली. उमा भारती यांनी शरद पवार यांना थेट श्रीरामद्रोही ठरवलं. तर उद्धव ठाकरे यांनी राममंदिराचे ई-भूमिपूजन करावे, असा सल्ला दिला होता.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना विचारले असता त्यांनी राम मंदिराचं भूमिपूजन धूमधडाक्यातच व्हायला हवं पण ही ती योग्य वेळ नाही, असे म्हटले. तसेच त्यांनी ई-भूमिपूजनाला देखील विरोध केला.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here