फडणवीस म्हणतात, हे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप…

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवीस यांनी हे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे, असा टोला लगावला आहे. 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारमधील वादविवाद खूप टोकाला गेले आहेत. हे कुटुंब आहे ते दुभंगलेलं आहे. याला कुटुंब म्हणूच शकत नाही. हे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे.

ठाकरे सरकार पाडण्यासाठी आम्ही कुठलेही प्रयत्न करणार नाही. आम्हाला त्यात अजिबात रस नाही. सध्या महामारीचा काळा आहे, महामारीची लढाई सुरु आहे. आम्ही आमच्यापरीने, क्षमतेने करोना संकटाशी लढतोय. पण माझं एक ठाम मत आहे. देशाच्या पाठीवर अशा प्रकारचं सरकार कधीच चाललं नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यामध्ये काँग्रेस आहे. काँग्रेसनेही याप्रकारचं सरकार कधीही चालू दिलं नाही. त्यामुळे देशाचा राजकीय इतिहास हा महाराष्ट्रात बदलेलं, असं आतातही यांच्यात दिसत नाही. अंर्तविरोधामुळेच हे सरकार पडेल आणि ज्या दिवशी हे सरकार पडेल त्यादिवशी आमच्यावर जबाबदारी येईल आणि आम्ही एक मजबूत सरकार महाराष्ट्राला देऊ.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here