अबब! दारुची तळप सॅनिटायझरवर भागवली, 9 जणांचा मृत्यू

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

दारू न मिळाल्याने तळीरामांनी चक्क सॅनिटायझर पिऊन दारूची तळप भागवली. मात्र यामुळे आतापर्यंत 9 जणांनी जीव गमावला असून आणखी घटना उघडकीस येऊ शकतात. 

ही घटना आंध्रप्रदेशच्या प्रकाशम् जिल्ह्यातील कुरीचेड परीसरातील आहे. बुधवारी तीन जणांचा तर शुक्रवारी 6 जणांचा मृत्यू झाला.

लॉकडाऊनमुळे दारुची दुकाने तब्बल 50 दिवस बंद होती. त्यानंतर 4 मे रोजी दारुची दुकाने उघडली. मात्र, दारूसाठी होणारी प्रचंड गर्दी पाहता सरकारने दारुच्या दरात वाढ करून दुकानांची संख्याही कमी केली. त्यामुळे अनेकांंना दारू मिळेनाशी झाली.

दारूच्या आहारी गेलेल्या व्यसनी नागरिकांनी अखेल अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर मिळवून त्याच्या बाटल्याच्या बाटल्या रिचवल्या. सिद्धार्थ कौशल यांनी सांगितले की, पोलीस चौकशीत अचानक सॅनिटायझरचा दुकानांमधून खप वाढल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्याचा बारकाईने शोध घेतला असता लोक दारूऐवजी सॅनिटायझर पीत असल्याचे समोर आले. य

मृत झालेले सर्वजण 25 ते 65 या वयोगटातील असून यामध्ये तीन भिका-यांचा समावेश आहे. मात्र, अशा प्रकारे आतापर्यंत 20 जणांची सॅनिटायझर पिल्याची माहिती असून आणखीही घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here