#NagarFightsCorona : जिल्हा रुग्णालयात आणखी 25 सुसज्ज बेड्सची व्यवस्था

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे आता कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी आणखी २५ सुसज्ज आयसीयू बेड्सची व्यवस्था. करण्यात आली आहे. ही यंत्रणा कार्यान्वीत झाल्याने गंभीर रुग्णावर तात्काळ उपचार शक्य होणार आहे. एकूण ५६ आयसीयू बेड्सची व्यवस्था येथे झाली आहे.
जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी ही व्यवस्था लवकरात लवकर तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य यंत्रणेने तात्काळ कारवाही करून वेळेत हे काम पूर्ण केले आणि येथील आयसीयू यंत्रणा वेळेत कार्यान्वित केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here