Shevgaon Breaking : लाचखोर पोलिसाला अटक

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीच्या जामिनासाठी कोर्टात पोलिसांचा  अहवाल सादर करण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी साहेबांना सांगतो, असे म्हणून त्या मोबदल्यात आरोपीच्या वडिलांकडे 25 हजार रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल सोमनाथ आसाराम सोनटक्के ( वय 32 ) रा .डॉ .बटुळे निवास खंडोबा नगर आखेगाव रोड शेवगाव यास लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने पंचासमक्ष ताब्यात घेतले. ही कारवाई अहमदनगर येथील लाच प्रतिबंधक पथकाने केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील मुंगी येथील एकावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपीला कोर्टात जामीन मिळण्यासाठी पोलिसांचा अहवाल पाठविण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी साहेबांना सांगतो, असे म्हणून पोलिस कॉ. सोमनाथ सोनटक्के याने आरोपीच्या वडिलांकडे 25 हजार रुपयाची मागणी केली होती.

ही रक्कम दि. 24 जुलै रोजी देण्याचे ठरले होते.
याप्रकरणी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या लाच मागणीची पडताळणी करून सोनटक्के याने पंचा समक्ष ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली असता त्यास आज अटक करण्यात येऊन त्याचे विरूध्द शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस उपअधीक्षक निलेश सोनवणे ,नगर लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक हरीश खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली, या विभागाचे पोलीस निरीक्षक श्याम पवरे ,पोलीस कर्मचारी तन्वीर शेख, प्रशांत जाधव, वैभव पांढरे यांचे पथकाने आज ही कारवाई केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here