आज भाजपाचे दूधभाव वाढीसाठी आंदोलन
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
बीड – राज्यात आघाडी सरकार आल्यापासून शेतकरी बांधवांना या सरकारने कोणताही दिलासा दिलेला नाही. कष्टांची पराकाष्ठा करत शेतकरी आपला प्रपंच आणि व्यवसाय करतो आहे. कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये राज्य शासनाचे कोणतेही पॅकेज मिळाले नाही.
कृषी मालाला योग्य भाव मिळाला नाही. विकलेल्या मालाचे पैसे वेळेवर मिळाले नाही. उलट दुबार पेरणीचे संकट झेलत राम भरोसे जीवन शेतकरी बांधव जगत आहे. शेतकऱ्यांच्या खिशाला साथ देणाऱ्या दुधाच्या व्यवसायाला या सरकारने वाईट दिवस आणले. भाजपा महायुती सरकारने प्रति लिटर दुधाला पाच रुपये अनुदान दिले होते. ते अनुदानही आज या सरकारने थकित ठेवले. राज्यातील दूध उत्पादक शेतकरी सतरा-अठरा रुपये भावाने शासनाकडे दूध घालतो. भाव वाढीची मागणी करूनही सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही. पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले दुधाचे भाव मात्र जमिनीला टेकले. तरीसुद्धा राज्य सरकारला दूध उत्पादक शेतकऱ्यांची कोणतीही चिंता वाटत नाही. शेतकऱ्यांची ही चिंता रस्त्यावर आणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने आज जिल्हाभरात आंदोलन करण्यात येणार आहे.

हे आंदोलन शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी व सरकारला जाब विचारण्यासाठी आहे. राज्यातील गोरगरीब दूग्ध व्यवसायिकांना न्याय मिळाला पाहिजे. प्रति लिटर 30 रुपये भावाने दूध खरेदी झाले पाहिजे. अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली पाहिजे. दूध भुकटी निर्यातीला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावे. दुधाळ जनावरांचा शासनाने विमा उतरावा. मागणीप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात यावा. या मागण्यांचा पाठपुरवठा करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी या आंदोलनामध्ये सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व दूध उत्पादक शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा युवा नेते तथा स्वाभिमान संघटना जिल्हाप्रमुख प्रा. सचिन भैय्या उबाळे यांनी केले आहे.

propecia and depression – site what’s propecia
tadalafil professional – canadian pharmacy tadalafil tadalafil 10mg