Sangamner : आज दुपारपर्यंत नवीन 27 कोरोना बाधित रुग्ण… एकूण रुग्ण संख्या 728…

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | विकास वाव्हळ

संगमनेरची कोरोना बाधित रुग्ण संख्या दिवसेंदिवस उगररूप धारण करताना दिसत आहे. आज दुपारपर्यंत एकूण रुग्ण संख्या ही 728 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे येथे भीतीयुक्त वातावरण पसरले असून संगमनेरकरांच्या काळजीत भर पडली आहे.

आज सकाळी आलेल्या अहवालात 18 जण पॉझिटिव्ह होते. त्यात 4 पोलिसांचा समावेश होता. तर दुपारी 9 जणांचा अहवालात पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना रुग्णांनी आता जवळजवळ सर्वच क्षेत्रात प्रवेश केलेला दिसत आहे. आज सकाळी शुक्रवारी रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये शहरातील 13 तर तालुक्यातील 5 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये शहरातील रंगार गल्लीतील एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

यामध्ये  62, 29 वर्षीय महिलेसह 06 वर्षीय बालिका व 05 महिन्याच्या बलिकेका, 09 वर्षीय मुलगा व 27 वर्षीय पुरुष यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर माळीवाडा येथे 32 वर्षीय पुरुष, 02 वर्षीय बालिका, मालदाड रोड येथील 30 वर्षीय महिला, पद्मानगर येथील 45 वर्षीय पुरुष, जनतानगर येथे 29 वर्षीय पुरुष व 31 वर्षीय महिला तसेच पोलीस कॉलनी येथील 26 वर्षीय महिला कोरोना बाधीत आढळून आली.

तालुक्यातील आंबी खालसा येथील 43 वर्षीय पुरुष, निंबाळे येथील 42 वर्षीय पुरुष, कनोली येथील 54 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 39 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. यात दोन पोलीस व दोन महिला पोलीस अशा चार पोलीसांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे चारही पोलीस संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. हे सर्व अहवाल अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

आज दुपारी शासकीय प्रयोगशाळेतील अहवाला नुसार देवाचा मळा येथील 30 वर्षीय तरुण ,31 वर्षीय महिला, 7 वर्षीय बालिका, आश्वि बुद्रुक येथील 27 वर्षीय तरुणी, घुलेवाडी येथील 9 वर्षीय मुलगा, 30 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष, तर खाजगी प्रयोगशाळेच्या अहवाला नुसार  चिकणी येथील 28 वर्षीय तरुण, महात्मा फुले नगर येथील 29  वर्षीय तरुण पॉझिटिव्ह आले आहेत.

संगमनेरची एकूण रुग्णसंख्या 728 इतकी असून यामध्ये 527 जण उपचारानंतर बरे झाले असून सध्या 182 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर प्रशासकीय नोंदीत 19 बळींची नोंद घेण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here