Rahata : शहरात आढळले सात कोरोना बाधित रूग्ण

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहाता – शहरातील सात जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नागरिकांची चिंता वाढली आहे. शहरातील साईनगर नवनाथनगर परिसर व जुन्या गावठाण हद्दीत, असे मिळून सात रुग्ण बाधित असल्याचे प्रयोगशाळेतील अहवालावरून निष्पन्न झाले असल्याचे समजताच राहतेकरांची धाकधूक वाढली.

दिवसेंदिवस शिर्डी व राहाता परिसरात तालुक्यात रूग्ण आढळून येत असल्याने लोक चिंतेत आहेत. राहाता शहरात या अगोदर कोरोनाच्या पाच ॲक्टिव केस आहेत तर शुक्रवारी नव्याने सात रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्याने आता शहरातील कोरोना बाधितांची संख्या 12 झाले असल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी दुपारी राहाता शहरातील भर लोकवस्ती असलेल्या साईनगर तसेच नवनाथनगर परिसर व जुन्या गावठाण हद्दीत कोरोना संसर्ग बाधित रुग्ण असल्याचे प्रशासनाला अहवालावरून समजले. नंतर प्रशासनाने तातडीने बाधित रुग्ण असलेला परिसर सील करून निर्जंतुकीकरणाची मोहीम हाती घेतली आहे.

सात जण करोना बाधित असल्याचा अहवाल दुपारी प्राप्त झाल्याने शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने सर्व बाधितांना शिर्डी कोविड सेंटरमधे हलविले असून या बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ज्या परिसरात रूग्ण सापडले तो परिसर सिल करून निर्जंतूकीकरण मोहीम सुरू केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here