Newasa : वर्दीला नाही संसर्गाच्या भीतीमुळे पोलिसांना बघून माणसे काढतात पळ!

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
नेवाशात आता ‘वर्दीला’ नव्हे तर पोलिसांना झालेल्या कोरोनाच्या लागणीमुळे पोलिसांना बघून लोक पसार होत असल्याचे दिसून येत आहे. २१ आरोपींना व ५ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे पोलिस दिसले की, त्यांच्याजवळ कोणी लवकर जाण्यास धजावत नसल्याचे चिञ नेवासेकरांना पहावयास मिळत आहे.
तालुक्यातील सोनई येथील एक पोलिस अधिकारी व आरोपीला कोरोनाची बाधा झाल्यानंतर नेवाशात २१ आरोपी व ५ पोलिसांना कोरोनाची शिकार बनावे लागले आहे. त्यामुळे पोलिसांच्या संपर्कात कोण-कोण आले. त्यांची तपासणी करुन घेण्यात आरोग्य विभाग कामाला लागला आहे. नेवाशात २१ आरोपी कोरोनाची शिकार बनल्याने त्यांच्या उपचारादरम्यान कोण लक्ष देणार ? मग पाच पोलिसही कोरोना बाधित झाल्यामुळे हे ५ कर्मचारी अजून किती लोकांच्या संपर्कात आले असतील? असे एक ना अनेक प्रश्नावर सध्या वरिष्ठ पोलिस अधिकारी विचारमंथन करत आहेत. सध्या २१ आरोपींची उपचार व्यवस्था नेवासा पोलिस ठाण्याच्या गार्डरुम जवळच करण्यात आलेली असल्याचे कळते आहे.
पोलिसांना आता कोरोनाची लागण झाल्याने भीतीने नाहीतर संसर्ग रोगामुळे सामान्य माणूस त्यांच्यापासून पळ काढत असल्याचे सर्वसामान्य माणसांना आता कोरोनाच्या लागणची भीती निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here