ना. म. साठे सर
अण्णाभाऊंनी कथा, कादंबरी, पोवाडे, लावणी, गीते, प्रवास वर्णन, नाटक, लोकनाट्य असे विविध प्रकार हाताळले आहेत. वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी हे त्यांच्या लिखाणाचे सूत्र होते. उपेक्षित दलित वंचितांच्या बाजूने त्यांच्या उत्थानासाठी अण्णाभाऊंनी आपली लेखणी झिजवली. त्यांचे नायक नायिका आपल्या हक्कासाठी सन्माना’साठी निष्ठापूर्वक संघर्ष करताना दिसतात. अण्णाभाऊ महान साहित्यिक असून ते जन आंदोलनात सक्रिय झालेले कार्यकर्ते देखील होते. ते एका विशिष्ट जातीचे जमातीचे व समाजाचे नव्हते. तर ते हे जगातील कष्ट करणाऱ्यांचे शोषितांचे प्रतिनिधी होते. त्यांनी त्यांचे प्रतिनिधित्व निष्ठेने आणि आणि स्वाभिमानाने केले व लेखणी आणि वाणीचे बलिदान दिले.
अण्णाभाऊंचे साहित्य अतिशय दर्जेदार आणि खूप मोठ्या उंचीचे साहित्य अण्णांनी निर्माण केले. त्यांचा फकीरा जिवंत वाटतो रक्त प्रवाहित करणारा वाटतो माकडीचा माळ समस्त उप-यांचे प्रतिनिधित्व करतो. त्यांचा सत्त् गरिबांचा वाली वाटतो. एकमेव साहित्यिक अण्णाभाऊ यांनी पाटील आदर्श दाखवला फकिरामधील शंकर पाटील सत्त् ही आदर्श माणसं गावाच्या अभिमानाचं प्रतिनिधित्व करतात. फक्त अण्णाभाऊंनी रेखाटलेली बहेती लहारो के साथ तो कोई भी तैर सकता है, लहारोको चीर कर जो चलता है वही असली इन्सान कहलाता है!
अण्णा भाऊने कामगारांच्या श्रमिकांच्या कष्टाची त्यांना जाणीव होती. श्रमिक कामगार देशाच्या अर्थव्यवस्थेचा आहे. हे त्यांना माहित होते. श्रमिक कष्टकऱ्यांची महती सांगण्यासाठी त्यांनी सण 1958 ला पहिले दलित साहित्य संमेलनाप्रसंगी वैज्ञानिक दृष्टी असलेला मंत्र म्हणजे पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे, असा गगनभेदी संदेश समस्त बहुजनांना दिला. अण्णाभाऊ लोकनाट्याचे जनक होते. भारतातील एकमेव साहित्यसम्राट म्हणून अण्णाभाऊ देशाच्या इतिहासात आहेत.
जगभरातील सत्तावीस देशात त्यांचे साहित्य अनुवादित झाले. समृद्ध आणि परिपक्व असं साहित्य अण्णांनी निर्माण केले. साहित्य हे क्रांतीचे कुळ आणि बंडाचे मूळ असते. माणूस माणुसकी आणि मानवतावाद हा त्यांच्या साहित्याचा अर्क होता. सन 1949 ते 1969 पर्यंत अण्णाभाऊंनी 77 ग्रंथांची निर्मिती केली असून दीड दिवस औपचारिक शिक्षण घेतलेल्या अण्णाभाऊंनी वास्तवदर्शी अशी साहित्यनिर्मिती केली असून मॅक्झिम गॉर्कीचा वसा पेलण्याचे काम त्यांनी केले. क्रांतीचे बीज पेरण्याचे शस्त्र म्हणजे अण्णाभाऊंचे साहित्य होय.
आजची शिक्षण व्यवस्था अनुभवल्यानंतर लक्षात येते की आजच्या मुलांची ज्ञानाची भूक किती मोठी आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन केले गेले आणि शिक्षण विभागाने या काळात एक नवीन शिक्षण प्रणाली विकसित केली. ऑनलाइन शिक्षण पद्धती म्हणजे आजच्या पिढीला खूप साधने असून देखील एखादा उच्चशिक्षित असणारी व्यक्ती सुद्धा स्वतःबद्दल दहा पंधरा ओळी लिहून दाखवू शकत नाही. मात्र, त्याकाळात व्यवस्थेने नाकारलेल्या समाजात जन्माला आलेल्या आणि दीड दिवस औपचारिक शिक्षण घेतलेल्या अण्णाभाऊंनी 1949 ते 1969 पर्यंत 77 ग्रंथांची निर्मिती केली. आपल्या कार्य व कर्तृत्वने सिद्ध करून दाखवले कोणत्या समाजात जन्माला यावे. हे आपल्या हातात नसते. मात्र जन्माला आल्यानंतर कशासाठी, कोणासाठी काय व कसे करावे हे आपल्या हातात असते हे अण्णांनी सिद्ध करून दाखवले.
त्यांच्या विचाराचा जागर संपूर्ण महाराष्ट्रात जन्मशताब्दी वर्ष असल्याने ऑनलाइन फेसबूकवर खूप मोठ्या उंचीच्या साहित्यिकांची व्याख्याने चालू असून त्यांच्या साहित्यातील विचारांचा जन्मशताब्दी सोहळा आजच्या तरुणांनी मोठ्या हिमतीने आणि ताकतीने पुढे नेण्यासाठी एकत्रित आले पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांचे कार्य जगद्विख्यात साहित्यसम्राट, शिवचरित्रकार, प्रबोधनकार, अर्थशास्त्रीय जाणिवांनी ओतप्रोत सामाजिक परिवर्तनकार सह्याद्रीच्या उंचीचे प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व शोषितांच्या वंचितांचा आवाज संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील क्रांतिकारी शिरोमणी, गोवा मुक्तिसंग्राम, मराठवाडा मुक्तिसंग्राम, हैदराबाद मुक्तिसंग्राममध्ये सहभागी होऊन आपले 1942 ते 1969 म्हणजे साधारण पाव शतक अण्णाभाऊंनी मानवमुक्तीचा जाहीरनामा आपणाला जतन करून अर्पण केला.
त्यांची प्रेरणा अण्णाभाऊंचे अनुयायी म्हणविणाऱ्या तरुण पिढीने एकत्रित येऊन अण्णाभाऊंच्या शताब्दी वर्षात त्यांच्या विचाराला आणि कर्तृत्वाला न्याय देण्याच्या दृष्टीने राज्यकर्त्याने आणि सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याने सामूहिक प्रयत्न करून या शासनाला जागृत करावे आणि साहित्यरत्न अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा म्हणून अखंड प्रयत्न व्हावेत हीच अपेक्षा करून अशा सत्यशोधक अण्णाभाऊंना माझा क्रांतिकारी सलाम!
propecia alternative – http://propechl.com/ finasteride for men
propecia and beard growth – propecia vs finasteride before and after finasteride
tadalafil online – generic tadalafil reviews buy tadalafil generic online