Newasa : सलग दुसऱ्या दिवशीही मुळाथडी परिसरात पावसाचा हाहाकार

बाळासाहेब नवगिरे

पानेगाव – सुरुवातीपासून वरुणराजाने येथे मोठ्या प्रमाणावर कृपा केल्याने या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामातील पिकांचे नियोजन केले. परंतु बहुतेक कंपन्यांचे सोयाबीन तसेच बाजरी बियाणे बोगस निघाल्याने उगवण कमी प्रमाणात झाली असल्याने काही शेतकऱ्यांना सोयाबीन बाजरी मोडून तातडीने कपाशी, ऊस,मका पिकांची लागवडी केल्याएवढं असूनही बळीराजा थकला नाही परंतू आज परिस्थिती अतिवृष्टीमुळे गंभीर बनली असून मागील चौदा दिवसांपासून पडणारा रिमझिम तर कधी जोराचा पावसात दोन दिवस विश्रांती मिळाली होती. परंतु कालपासून पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करून या परिसरातील असणारा लेंडगा ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने सोनईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर पाणी वाहत असल्याने मोठी कसरत शेतकरी व्यापाऱ्यांना तसेच प्रवासांना करावी लागत आहे.

खेडले परमानंद, शिरेगाव पानेगाव, करजगाव,वाटापूर, तामसवाडी, गोणेगाव गोमळवाडी ओढ्याच्या परिसरात असणारे सर्वच पिके पाण्याखाली गेल्याने अति प्रमाणात पाणी झाल्याने ते पिके जवळपास गेल्यात जमा आहे. अगोदरच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याने आता अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आता तरी महाविकास आघाडी सरकारने तातडीने शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची पंचनामे करून मदत करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे.

कोरोना विषाणू आल्यापासून शेतकरी पूर्णपणे अर्थिक संकटात सापडला. दुधाला भाव नाही. त्यामुळे सध्या दुधधंदा मोडकळीस आला आहे. तसेच कांदाला भाव नाही कांदा चाळीत सडत असून याबाबत राज्य, तसेच केंद्र सरकारने तातडीने भरीव मदत करावी व अतिवृष्टीमुळे गेलेल्या पिकांचे नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी पंचवीस हजार रुपये द्यावे, अशी मागणी अंमळनेर संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ घावटे, मच्छिंद्र पाटील संस्थेचे संचालक चंद्रकांत टेमक, सतिश फुलसौंदर, किशोर बाचकर, विठाई संस्थेचे अध्यक्ष परमानंद जाधव, गोविंद बाबा संस्थेचे अध्यक्ष संदिप जाधव, ज्येष्ठ विधिज्ञ पांडुरंग माकोणे, आदींनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here