Shevgaon : ढोरजळगाव येथे 5 व्यक्ती कोरोना बाधित

4
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

ढोरजळगांव – शेवगांव तालुक्यातील ढोरजळगांव येथील ५० वर्षीय व ५५ वर्षीय एकाच कुटुंबातील दोन पुरूष व्यक्तीच्या संपर्कातील १६ पैकी ५ व्यक्ती कोरोना बाधित व्यक्ती आढळून आले आहेत. ढोरजळगांवचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशिल बडे व जगदीश कुलकर्णी यांनी बोलताना सांगितले. 
ढोरजळगांव येथील एकाच कुटुंबातील दोघांना ताप सर्दी घसा त्रास जाणवू लागल्याने अहमदनगर येथील विखे रूग्णालय  येथे दाखल करण्यात आले होते. त्या दोघेही जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यांच्या संपर्कातील असणा-या १६ जणांचे स्वब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी एकाच कुटुंबातील दोन व्यक्तीच्या संपर्कातील ५ जण बाधित आढळून आले असून उर्वरित ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

ग्रामीण भागात कोरोनाची वाढत चाललेली रूग्ण संख्या चितेंची बाब आहे. ढोरजळगांव येथील सात व्यक्ती कोरोना बाधितच्या पार्श्वभूमीवर तहसिलदार अर्चना पागिरे यांनी शुक्रवारी (३१) रात्री १२ पासून पुढील ९ ऑगस्टपर्यंत १० दिवस ढोरजळगांव परीसरातील अत्यवश्यक सेवा बँक शासकीय कार्यालय कृषिसेवा केंद्र वगळता कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here