दिलासादायक : विनाअनुदानित घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ नाही

  0

  प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

  विनाअनुदानित घरगुती गॅसच्या किंमतीत येत्या 1 ऑगस्टपासून वाढ होणार असे बोलले जात असतानाच दिलासादायक वृत्त आहे. या महिन्यात तरी गॅसच्या किंमतीत वाढ नाही. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

  यापूर्वी दोन वेळा घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आधीच लॉकडाऊनमुळे त्रासलेल्या जनतेला महागाईचा झटका बसला होता. मात्र या महिन्यात गॅसच्या किंमतीत वाढ न झाल्याने मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here