राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अपघातग्रस्ताला दिली स्वतःची गाडी, अन् दुस-याच्या दुचाकीवर गेले घरी

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका अपघातग्रस्ताला स्वतःची गाडी देऊन नंतर दुस-याच्या दुचाकीवर बसून स्वतःचे घर गाठले. त्यांच्या या कृतीचे स्वागत करण्यात येत आहे. 

इंदापूर तालुक्यातील जंक्शन या गावाजवळ बारामती-इंदापूर राज्यमार्गावर शुक्रवारी रात्र (दि.31) दोन दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. अपघातात एक व्यक्ती डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी अवस्थेत बेशुद्ध पडला होता. त्यामुळे बघ्यांची गर्दी जमली. मात्र, कोणी मदत करत नव्हते.

यावेळी भरणे आपल्या गाडीने पुण्याहून आपल्या घरी इंदापूरला जात होते. त्यांना रस्त्यात गर्दी दिसल्याने विचारपूस केली असता अपघात झाल्याचे समजले. यावेळी तातडीने त्यांनी गाडीतून उतरून अपघातग्रस्ताची माहिती घेतली. आणि आपल्यागाडीने त्याला रुग्णालयात पाठवले. वेळेत मदत मिळाल्याने या व्यक्तीचे प्राण वाचले. त्यानंतर भरणे हे दुस-या एकाच्या दुचाकीवर बसून घरी गेले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here